आयशर - रिक्षा अपघातात चार महिला गंभीर

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : भरधाव आयशरने रिक्षाला धडक दिल्याने चार मजूर महिला गंभीर जखमी झाल्या. गंगापूर वैजापूर मार्गावरील जाखमाथा शिवारात सोमवारी (दि.६) रात्री आठ वाजता हा अपघात घडला.
ज्योती जराड (वय ३८) मीरा मोहिते (५५), ताराबाई जाधव (५६), लताबाई परमेश्वर (४४) सर्व रा. समतानगर, गंगापूर अशी अपघातातील जखमी महिलांची नावे आहे. त्या शेतात काम करून रात्री रिक्षातून गंगापूरकडे चालल्या होत्या. त्यांच्या रिक्षाला भरधाव
आयशरने धडक दिली. अपघात होताच आयशर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर शहरातील रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे सागर खर्डे व इतरांनी दोन रुग्णवाहिकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुदाम लगास, डॉ. शेख नसिद यांनी जखमीवर प्रथमोपचार करूने त्यांना पुढील उपचार कामी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले.